Download App

मोठी बातमी, 17 मे पासून पुन्हा सुरु होणार IPL, नवीन वेळापत्रक जाहीर

IPL New Schedule Announced : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित

IPL New Schedule Announced : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी वेळापत्रक जाहीर केला आहे. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, 17 मे पासून आयपीएल पुन्हा एकदा सुरु होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या ताणावामुळे बीसीसीआयने काही दिवसांसाठी आयपीएल 2025 (IPL 2025) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव संपल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यासांठी वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल 2025 मध्ये अजून एकूण 17 सामने खेळायचे आहेत. ज्यामध्ये चार प्लेऑफ सामने आहे.

नवीन वेळापत्रकानुसार आयपीएलचा  पहिला क्वालिफायर 29 मे रोजी होईल, त्यानंतर एलिमिनेटर 30 मे रोजी होईल, तर दुसरा क्वालिफायर 1 जून रोजी होईल. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल.

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तर दुसरीकडे 17 मे पासून पुन्हा सुरू होणाऱ्या या स्पर्धेत दोन डबल हेडर सामने खेळले जाणार आहे. आयपीएल 2025 मध्ये 18 आणि 25 मे रोजी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. मात्र नॉकआउट सामन्याच्या ठिकाणाबद्दल बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.

अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा 

follow us