Jasprit Bumrah got Player of the June Month by ICC : टी 20 विश्वचषकात दमदार कामगिरी (T20 World Cup) करत टीम इंडियाने विश्वचषक (Team India) पटकावला. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय दर्जेदार राहिली. साखळी फेरीपासून ते थेट अंतिम सामन्यापर्यंत एकही पराभव झाला नाही. संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी केली. तरीही संघात असे काही मॅचविनर खेळाडू होते ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी करत भारताला कायमच विजयाच्या मार्गावर ठेवले. यातीलच एक नाव म्हणजे जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah).
महायुतीने सेट केलं हडपसरचं गणित… वसंत मोरेंच्या एन्ट्रीने मविआतील इच्छुकांच्या गर्दीत भर
बुमराहने या (Jasprit Bumrah) स्पर्धेत सुरुवातीपासूनच अव्वल कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात अत्यंत चिवट गोलंदाजी केली. अचूक मारा केला आणि मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या. त्याच याच कामगिरीची दखल आयसीसीनेही (ICC) घेतली आहे. जसप्रित बुमराहला मिळाले आहे. आयसीसीने जून महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जसप्रित बुमराहला जाहीर केला आहे.
मराठवाड्यात भाजपला धक्क्यावर धक्के! आता नाराज माजी गृहराज्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
या पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रित बुमराह आणि अफगाणिस्तानचा गुरबाज शर्यतीत होते. परंतु, बुमराहने बाजी मारली. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बुमराहने एकूण 15 विकेट्स घेतल्या. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने फलंदाजांना जास्त धावा घेण्याची संधी मिळाली नाही.
विधानसभेला नव्या समीकरणांची नांदी : बच्चू कडू-संभाजीराजे छत्रपतींची तासभर बंद दाराआड चर्चा
या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने अतिशय (Jasprit Bumrah) चिवट गोलंदाजी केली. धावा तर कमी दिल्याच शिवाय वेळेवर ज्यावेळी संघाला गरज होती तेव्हा विकेटही मिळवून दिल्या. या सामन्यात सुरुवातीला धक्के बसल्यानंतर क्विंटन डिकॉकने आफ्रिकेचा डाव सावरला होता. त्यावेळी भारत पराभूत होतो की काय अशी शंका सगळ्यांनाच येत होती. सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणे हाच पर्याय होता. त्यामुळे सोळावी ओव्हर बुमराहला देण्यात आली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 रन दिले. त्यानंतर पुन्हा अठराव्या ओव्हरमध्ये तर फक्त दोन रन देत 1 विकेटही घेतली ज्याची भारताला गरज होती. शेवटच्या टप्प्यातील त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली. जसप्रित बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.