Download App

10 वर्षांनंतर उनाडकटचे वनडेत पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्धच शेवटचा सामना खेळला होता

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने दोन बदल केले आहेत. एकीकडे ऋतुराज गायकवाडला या दौऱ्यावर पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली, तर दुसरीकडे डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले. अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी हे दोन बदल करण्यात आले आहेत.

शेवटचा वनडे 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला
जयदेव उनाडकटला 10 वर्षांनंतर वनडे खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने शेवटचा वनडे 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. एमएस धोनी त्यावेळी संघाचा कर्णधार होता आणि तो सामना कोचीमध्ये खेळला गेला होता. उनाडकटने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 6 षटके टाकली, 28 धावा दिल्या आणि एकही बळी घेतला नव्हता. भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला होता.

किशन, सॅमसनची तुफानी फलंदाजी, गिलचे शतक हुकले; टीम इंडिया मजबूत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली नाही
त्यानंतर जयदेव उनाडकटची मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2010 पासून खेळत असलेल्या उनाडकटने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 4 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 3 आणि 8 बळी घेतले आहेत. जयदेव उनाडकटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याचे पुनरागमन झाले आहे.

Tags

follow us