किशन, सॅमसनची तुफानी फलंदाजी, गिलचे शतक हुकले; टीम इंडिया मजबूत

किशन, सॅमसनची तुफानी फलंदाजी, गिलचे शतक हुकले; टीम इंडिया मजबूत

IND Vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ईशान किशन, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांनी तुफानी खेळी केली आहे. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 39 ओव्हरमध्ये 244 धावा केला आहे. सध्या सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या मैदानात आहेत.

दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. भारतीय संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. या दौऱ्यावर ऋतुराज गायकवाडला पहिल्यांदाच संधी मिळाली, तर जयदेव उनाडकटला 10 वर्षांनंतर वनडे खेळण्याची संधी मिळाली. भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. भारताची पहिली विकेट ईशान किशन रुपात पडली. तो 64 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 19.4 षटकात 1 बाद 143 धावा होती. त्यानंतर लगेच 154 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या रूपाने भारताला आणखी एक धक्का बसला. ऋतुराज गायकवाडने 14 चेंडूत 8 धावा केल्या.

जीएसटीने सरकारची तिजोरी भरली, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

सॅमसनची तुफानी खेळी
संजू सॅमसनने येताच षटकारांचा वर्षाव केला. संजू सॅमसन 41 चेंडूत 51 धावा करुन बाद झाला. सॅमसनने या छोट्या डावात चार षटकार आणि दोन चौकार मारले आहेत. सॅमसन बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 31.5 ओव्हरमध्ये 3 बाद 223 झाली होती. गिल 80 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 81 धावा करून खेळत आहे. त्याच्या जोडीला हार्दिक पांड्या 9 धावांवर खेळत आहे.

गिल शतक हुकले
शुभमन गिल शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण गिल 92 चेंडूत 85 धावांवर बाद झाला आहे. गिल बाद झाला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या चार विकेट गमावून 246 धावा होती. हार्दिक पांड्या 11 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे.

कार्यक्रमात अजित पवार शरद पवारांच्या मागून का गेले? दादांनी सांगून टाकलं

भारताची प्लेइंग 11 :
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube