Ashes 2023 : अॅशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. रूटला तब्बल 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावता आले आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात रुटच्या बॅटने 157 चेंडूत 118 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात त्याने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. यासह, आता सध्याच्या फॅब 4 फलंदाजांच्या यादीत, शतक झळकावण्याच्या बाबतीत रूट पहिल्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या अगदी जवळ पोहोचला आहे. (joe-root-has-slammed-his-30th-test-ton-and-is-now-2nd-in-the-list-of-fab-4)
कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ सध्या फॅब 4 च्या यादीत आघाडीवर आहे. स्मिथच्या नावावर 31 कसोटी शतके आहेत, तर जो रूटच्या नावावर 30 शतके आहेत. या यादीत केन विल्यमसन आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही फलंदाजांच्या नावावर 28-28 कसोटी शतके आहेत.
जो रूटच्या 30व्या कसोटी शतकाच्या जोरावर इंग्लंडने खेळाच्या पहिल्याच दिवशी 8 गडी गमावून 393 धावा करत पहिला डाव घोषित केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा एकही बिनबाद 14 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांनी झटपट अर्धशतक झळकावले.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
सक्रिय खेळाडूंमध्ये शतके ठोकण्याच्या बाबतीत रूट दुसऱ्या स्थानावर आहे
त्याच्या 30व्या कसोटी शतकामुळे, जो रूट आता सक्रिय खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जो रूटच्या नावावर आता 46 शतके नोंदवली गेली आहेत. या बाबतीत विराट कोहली 75 आंतरराष्ट्रीय शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर 45 शतकांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.