लोकेशनची माहिती न दिल्याने ऑलिम्पियन जूडोपटू तुलिका मान निलंबित; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

तुलिका मान गेल्या दशकभरापासून भारतीय जूडोमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

News Photo   2026 07 24T165756.036

लोकेशनची माहिती न दिल्याने ऑलिम्पियन जूडोपटू तुलिका मान निलंबित; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

ऑलिम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा (Olympics) स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय जूडोपटू तुलिका मान हिला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने तात्पुरते निलंबित केले आहे. गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा आवश्यक असलेली ‘व्हेअरअबाउट्स’ (लोकेशन) माहिती न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या निलंबनामुळे २७ वर्षीय हेवीवेट जूडोपटू तुलिका मानला स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे. भारतीय जूडो संघ अद्याप स्कॉटलंडसाठी रवाना झालेला नसून, जूडोचे सामने ३१ जुलैपासून सुरू होणार आहेत. भारतीय जूडोपटू २७ जुलै रोजी ग्लासगोसाठी रवाना होणार आहेत.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासाठी तीन खेळाडू करणार पदार्पण? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

तुलिका मानने २०२२ मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७८ किलोपेक्षा अधिक वजन गटात रौप्यपदक जिंकले होते. या कामगिरीमुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला जूडोपटू ठरली होती. यंदाच्या ग्लासगो स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा होती.

दरम्यान, एका जूडो प्रशिक्षकाने पीटीआयला सांगितले की, “गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा आवश्यक लोकेशनची माहिती न दिल्यामुळे NADA ने तुलिका मानला नोटीस बजावली असून, त्यामुळे तिची संघातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. यापूर्वी गुरुवारी भारताचा आणखी एक जूडोपटू अरुण कुमार (७३ किलो गट) स्पर्धेबाहेरील डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यानंतर त्यालाही भारतीय संघातून वगळण्यात आले.

तुलिका मान गेल्या दशकभरापासून भारतीय जूडोमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर दिल्ली पोलिस दलातील उपनिरीक्षक अमृता यांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या आठव्या वर्षी फुटबॉल सोडून तिने जूडोची वाट निवडली. प्रशिक्षक यशपाल सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीवर मात करत तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली होती.

Exit mobile version