Download App

कॉमेंट्रीटर केदार जाधवला ‘अच्छे दिन’ ; आयपीएलच्या ‘या’ संघात परतला

Kedar Jadhav Joins RCB: यंदाचा आयपीएलचा (IPL2023) सीझन सुरु झाल्यापासून एकापाठोपाठ खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा डेव्हिड विली जखमी झाल्याने उर्वरित सामन्यामधून बाहेर पडला आहे. जखमी डेव्हिड विलीच्या जागी मराठमोळ्या केदार जाधवला (Kedar Jadhav) संधी देण्यात आली आहे. आरसीबीने जाधवला त्यांच्या 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह संघात समाविष्ट केले आहे. विली या हंगामात आरसीबीसाठी केवळ 4 सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या.

केदार जाधवला यंदाच्या सीझनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नव्हते. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला होता. यानंतर तो जिओ सिनेमासाठी मराठी भाषेतून कॉमेंट्री करत होता. आता उर्वरित सामन्यासाठी केदार जाधव आरसीबीच्या संघात परतला आहे.

IPL 2023 : ऑरेंज कॅप विजेत्यांसाठी IPL ट्रॉफी अनलकी, आकडेवारी पाहून वाटेल आश्चर्य

2010 च्या मोसमात केदार जाधवने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 93 सामने खेळले आहेत, त्यापैकी 80 डावात फलंदाजी करताना 22.15 च्या सरासरीने एकूण 1196 धावा केल्या आहेत. यादरम्यान केदार जाधवने 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता. त्यावेळी आरसीबीकडून 17 सामने खेळण्याची संधी मिळाली होती.

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीने 8 सामने खेळल्यानंतर केवळ 4 सामने जिंकले आहेत. या हंगामात आतापर्यंत संघासाठी एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे मध्यक्रमाकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणे. त्यामुळेच केदार जाधवला संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. केदार जाधव संघात परतल्याने आरसीबीचा मध्यक्रम बळकट होईल का हे पाहावे लागेल.

https://youtu.be/4w6zTuEJ_7Q

Tags

follow us