‘…असंच भारताचे नाव रोशन करत राहा’ सचिनकडून विराटचं खास शब्दात कौतुक

८७ बॉलमध्ये ११३ धावा करत केलेल्या विराट कोहलीच्या ४५ व्या वनडे शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतर सर्वत्र विराटची चर्चा आहे. कारण विराट कोहलीने शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतर सचिनने स्वतः विराटसाठी ट्विट केले आहे. त्यात त्याचे कौतुक […]

Virat Kohli And Sachin Tendulkar

Virat Kohli And Sachin Tendulkar

८७ बॉलमध्ये ११३ धावा करत केलेल्या विराट कोहलीच्या ४५ व्या वनडे शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतर सर्वत्र विराटची चर्चा आहे.

कारण विराट कोहलीने शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतर सचिनने स्वतः विराटसाठी ट्विट केले आहे. त्यात त्याचे कौतुक केले आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,

‘अशीच मोठी कामगिरी करत राहा, भारताचे नाव रोशन करत राहा.’

 

विराटने या शतकी खेळीसोबत सचिनच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटच्या नावावर आता भारतामध्ये 20 एकदिवसीय शतके झाली आहेत, ज्यामुळे त्याने सचिनच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या दोघांशिवाय जगातील कोणत्याही फलंदाजाने घरच्या मैदानावर 20 शतके झळकावली नाहीत.

Exit mobile version