Lionel Messi : मोठी बातमी! लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Lionel Messi : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक

Lionel Messi

Lionel Messi

Lionel Messi : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अर्जेंटिनाने उपविजेतेपद पटकावले होते. स्पेनकडून अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. सोमवारी त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मेस्सीने 2022 च्या फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाला विजेतेपद मिळून दिले होते. तर त्याने सलग दोनदा ‘कोपा अमेरिका’चे विजेतेपदही जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मेस्सीने अर्जेंटिनासाठी 185 हून अधिक सामने खेळले आणि देशासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. आपल्या निरोपाच्या भाषणात मेस्सी म्हणाला, “अंतिम सामन्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर आणि खूप विचार केल्यानंतर, मला सर्वांना हे सांगायचे आहे की मी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय घेताना मला खूप वेदना झाल्या आणि आजही होत आहेत. पण मला जाणीव झाली आहे की हीच योग्य वेळ आहे.

केवळ गेल्या काही वर्षांत जेव्हा आम्ही सर्व काही जिंकले तेव्हाच नाही, तर त्याआधीही मी नेहमीच माझे सर्वस्व पणाला लावले. मी नेहमीच या जर्सीसाठी संघर्ष केला आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद देण्यासाठी व अर्जेंटिनी असल्याचा अभिमान वाटण्यासाठी माझे सर्वस्व दिले. आता फारसा वेळ उरलेला नाही आणि आयुष्यातील अनेक अध्याय संपत आहेत. हा असा एक अध्याय आहे ज्यामुळे मला खूप दुःख होत आहे. राष्ट्रीय संघाचा भाग असणे मला खूप आवडायचे आणि ते नेहमीच आवडत राहील. मी माझे सर्वस्व दिले आहे आणि आता देण्यासाठी माझ्याकडे काहीही उरलेले नाही. त्याच वेळी, अनेक प्रतिभावान तरुण खेळाडू पुढे येत आहेत जे येथे खेळण्यास पात्र आहेत.

मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

अर्जेंटिना पदार्पण: 2005

आंतरराष्ट्रीय सामने: 207

आंतरराष्ट्रीय गोल: 125  (अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू)

FIFA विश्वचषक: 2022 मध्ये अर्जेंटिनाला विजेतेपद

कोपा अमेरिका: 2021 आणि 2024 विजेता

Finalissima: 2022 विजेता

ऑलिम्पिक सुवर्णपदक: 2008

विश्वचषक अंतिम फेरी: 2014 आणि 2026

विश्वचषकातील सामने: 26

विश्वचषकातील गोल: 2026 पर्यंत 21

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार अन् मुख्य प्रशिक्षकही बदलणार-

विश्वचषकातील गोल्डन बॉल: 2014 आणि 2022  (दोन वेळा हा पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू)

Exit mobile version