FIFA World Cup 2026 : फिफा 2030 विश्वचषकात 64 देश; भारतालाही मिळणार संधी?

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एक उपांत्य फेरीचा सामना, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एक उपांत्य फेरीचा सामना, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना आणि अंतिम सामना बाकी आहे. पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सचा परभाव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत 48 संघांचा समावेश होता. ही स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. 2022 साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत 32 संघानी सहभाग घेतला होता. तर आता 2030 साली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत तब्बल 64 संघ सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

ईएसपीएन (ESPN) च्या वृत्तानुसार, फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी दुजोरा दिला आहे की, 2026  च्या स्पर्धेनंतर पुरुष फिफा विश्वचषकात 64 संघांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर फिफा संस्था चर्चा करेल. त्यांनी सांगितले की, फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर खेळण्याचे स्वप्न पाहण्याची संधी प्रत्येक देशाला मिळाली पाहिजे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांनी संयुक्तपणे 48 संघांच्या या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आणि ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. संघांच्या संख्येत वाढ करण्याबाबतची चर्चा ही स्पर्धा संपल्यानंतर केली जाईल.

एसपी ऑन एक्शन मोड! गुन्हेगाराशी संबध? ‘तो’ पोलीस निलंबित-

64 संघांच्या स्पर्धेच्या शक्यतेबद्दल विचारले असता, फिफा अध्यक्षांनी स्विस प्रसारक ‘ब्लू स्पोर्ट’ला सांगितले, “हा नक्कीच असा मुद्दा आहे ज्यावर या विश्वचषकानंतर संबंधित समित्यांकडून विचार आणि चर्चा केली जाईल. जेव्हा तुम्ही विश्वचषकाचे आयोजन करता, तेव्हा ते संपूर्ण जगासाठी आयोजित करणे आवश्यक असते. ही स्पर्धा केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेसाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे.”

जर फिफा विश्वचषक 2030 मध्ये 64 देशांनी सहभाग घेतला तर आशियामधून भारताला देखील विश्वचषक 2030 मध्ये सहभाग घेण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे.

follow us