‘में शर्मिंदा हूं…’, मेरी कॉमने भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले

Mc Mary Kom Steps Down As Paris Olympics Chef De Mission : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Mary Kom) शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उषा यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले. पीटी उषा यांनी […]

Meri Kom

Meri Kom

Mc Mary Kom Steps Down As Paris Olympics Chef De Mission : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Mary Kom) शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उषा यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले. पीटी उषा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून याबाबत मेरी कॉमने पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.

मेरी कॉमने पाठवलेल्या पत्रात म्हटलं. देशाची कोणत्याही स्वरुपात सेवा करणे अभिमानाची बाब आहे, त्यासाठी मी मनापासून तयार होते. मात्र, मला खंत आहे की मी ही जबाबदारी पेलवू शकत नाही. काही कारणास्तव मी माघार घेत आहे. अशी माघार घेणे त्याबाबत मी लाजिवारणी आहे, मात्र माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. ऑलिम्पिक खेळात सहभागी असणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल, असं मेरी कॉमने पत्रात स्पष्ट केलं आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला

मेरी कॉमच्या निर्णयाची खंत
ऑलिम्पिक पदक विजेता मेरी कॉम आपल्या पदावरुन हटत असल्याने आम्हाला दुख: होतं आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मान करीत असून त्यांच्याबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याचं पीटी उषा यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version