ICC T20 रँकिंगमध्ये आता मोठा बदल; इंग्लंड आता नंबर एकवर, भारत कितव्या स्थानावर ?

ICC T20 Ranking- भारताने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडविला आहे. दुसरीकडे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली.

Icc T 20 Ranking India

Icc T 20 Ranking India

Men’s T20I Team Rankings : आयसीसीच्या (ICC T20) नव्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीत मोठा बदल झालाय. भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारत आता टी-20 क्रिकेटमधील जगातील नंबर एक संघ राहिलेला नाही. इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान हिसकावले आहे. भारत (India) आणि इंग्लंड (England) या दोन्ही संघांच्या खात्यात 269 रेटिंग पॉइंट्स आहेत. मात्र, दशांशातील फरकामुळे इंग्लंडला पहिल्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

मोदींची मिमिक्री, राहुल गांधींचं हसणं अन् भाजपचा हल्लाबोल; इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये नेमकं काय घडलं?

भारताने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडविला आहे. दुसरीकडे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. या निकालाचा फायदा इंग्लंडला झाला आणि त्याने आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकले आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांच्या रेटिंगमध्ये 269 गुण दिसत असले, तरी प्रत्यक्षात दोघांमध्ये अतिशय कमी अंतर आहे. इंग्लंडचे रेटिंग 268.80, तर भारताचे रेटिंग 268.76 आहे. म्हणजेच केवळ 0.04 गुणांच्या फरकाने इंग्लंडने अव्वल स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका पाचव्या, पाकिस्तान सहाव्या आणि वेस्ट इंडिज सातव्या क्रमांकावर आहे.

पुण्यातील व्यावसायिक गर्लफ्रेंडसोबत फॉरेन ट्रिपला निघाला, पत्नीला सांगितलं खोटं; फोन बंद झाला अन्

हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची दमदार कामगिरी
हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या टी-20 संघाने शानदार कामगिरी केली आहे. ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडने 26 सामन्यांपैकी तब्बल 23 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही इंग्लंडने वर्चस्व राखत 3-0 असा विजय मिळवला. भारतानेही गेल्या काही काळात टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत. मात्र, या कामगिरीनंतरही भारताला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

टी-20 क्रमवारीतील टॉप-10 संघ
इंग्लंड – 269 गुण

भारत – 269 गुण

ऑस्ट्रेलिया – 260 गुण

न्यूझीलंड – 247 गुण

दक्षिण आफ्रिका – 243 गुण

पाकिस्तान – 240 गुण

वेस्ट इंडिज – 234 गुण

बांगलादेश – 224 गुण

श्रीलंका – 220 गुण

अफगाणिस्तान – 220 गुण

भारतासाठी पुढील मालिका महत्त्वाची
भारतीय संघ सलग दोन वेळा टी-20 विश्वविजेता ठरला आहे. मात्र, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाची सुरुवात काहीशी अडचणीची झाली होती. परदेशी दौऱ्यात भारताला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकांमध्ये विजय मिळवत चांगले पुनरागमन केले आहे. आता आगामी मालिकांमध्ये भारतीय संघाला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. विशेषतः वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतील निकालाचा क्रमवारीवर परिणाम होऊ शकतो.

Exit mobile version