Mitchell Starc : आयपीएल 2026 मध्ये सहापैकी तीन सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक आनंदाची बातमी दिली आहे. आयपीएल 2026 मध्ये स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला खेळण्याची परवानगी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर दिल्ली कॅपिटल्सची ताकद वाढणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मिचेल स्टार्क 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.
आयपीएल 2026 मध्ये (IPL 2026) दिल्लीने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये तीन विजय आणि तीन गमावले आहे. ते सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. त्यामुळे मिचेल स्टार्कचे (Mitchell Starc) पुनरागमन दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) मोठा दिलासा असणार आहे.
Cricket.com.au च्या एका अहवालानुसार, स्टार्क भारतातच मैदानावर आपली तंदुरुस्ती आणि वोर्कलोड वाढवेल आणि 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या दिल्लीच्या सामन्यात आयपीएल 2026 हंगामातील पदार्पण करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. कोपर आणि खांद्याच्या दुखापती कोपर आणि खांद्याच्या दुखापतींमुळे मिचेल स्टार्क जानेवारीपासून संघाबाहेर होता, परंतु आता त्याचे पुनरागमन अगदी जवळ आले असल्याचे दिसत आहे.
ॲशेस मालिकेत (Ashes Series) शानदार कामगिरी केल्यानंतर स्टार्क बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्ससाठी काही सामने खेळले होते. तर आता १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात तो आयपीएलमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे.
भाजपात प्रवेश करणार का? मतदानाचा हक्क बजावत तनपुरे स्पष्टच म्हणाले
तर दुसरीकडे इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूही आयपीएलमध्ये परतत आहेत. पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यासाठी सज्ज आहे, तर जोश हेझलवुडने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी यापूर्वीच पुनरागमन केले आहे.
