Download App

मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची वर्णी; वाचा, कोण आहेत मन्हास?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोण असेल याची चर्चा सुरु होती.

  • Written By: Last Updated:

दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मनहास हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनले आहेत. (BCCI)  मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाची जबाबदारी आता मिथुन यांच्याकडे असणार आहे.

मन्हास यांच्या नियुक्तीमुळे बीसीसीआयच्या खेळाडू केंद्रित धोरणांना आणखी बळकटी मिळेल. तसेच तरुण क्रिकेटपटूंच्या विकासावर विशेष भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम असणार आहेत. देवजीत सैकिया सचिव, प्रभतेज सिंग भाटिया संयुक्त सचिव आणि रघुराम भट्ट खजिनदार असतील. दरम्यान, अरुण धुमाल हे आयपीएलचे चेअरमन असतील.

IND vs PAK Final : दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल; भारत-पाकिस्तान फायनलसाठी सर्व तिकिटे सोल्ड आउट

मन्हास हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू आहेत. यापूर्वी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी ही भूमिका बजावली आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी आता ते अध्यक्षपद भूषविणार आहे. रॉजर बिन्नी यांना वयोमर्यादेमुळे राजीनामा द्यावा लागला होता. मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच एका अनकॅप्ड खेळाडू बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

follow us