ICC Rankings: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मुखात फक्त मोहम्मद सिराजचं(mohammed siraj) नाव आहे. त्यातच आज आयसीसीने वनडे क्रिकेटची(ICC ODI Cricket) क्रमवारी जाहीर केली आहे. त्यातही मोहम्मद सिराजनं अव्वल स्थान पटकावलं आहे. आशिया चषकमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध सहा विकेट घेतल्या. त्याचा सिराजला मोठा फायदा झाला आहे. त्या विकेटच्या जोरावर सिराजने आयसीसी क्रमवारीत गरुडझेप घेतली आहे.
Nitesh Rane : नितेश राणेंकडून पडळकरांची पाठराखण! म्हणाले, ‘संजय राऊत दादांवर..,’
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सिराजच्या गोलंदाजीमुळे संघाला फक्त 51 धावांचं लक्ष्य मिळालं. या सामन्यात सिराजने 7 षटकात फक्त 21 धावा देत 6 विकेट घेतल्या. आशिया कप सुरु होण्यापूर्वी मोहम्मद सिराज 643 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर होता. आता सिराजयाने 8 स्थानांची गरुडझेप घेत अव्वल स्थान मिळवलं आहे.
Top of the world 🔝
India's ace pacer reigns supreme atop the @MRFWorldwide ICC Men's ODI Bowler Rankings 😲
— ICC (@ICC) September 20, 2023
सिराजचे आता 694 रेटिंग गुण आहेत. सिराजने आशिया कपमध्ये 12.2 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. याआधी मोहम्मद सिराज मार्च 2023 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्यानंतर जोश हेजलवुडने अव्वल स्थान पटकावले होते.
आता ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 678 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 677 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव तीन रेटिंग गुणांनी घसरुन नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याचबरोबर फलंदाजीमध्ये टीम इंडियाचा शुभमन गिल 814 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 857 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियासाठी शुभमन गिल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तसेच विराट कोहली एका पॉइंटने घसरुन 8 व्या स्थानी तर रोहित शर्मा 10 व्या स्थानावर पोहोचला आहे.