Download App

Video: मोहम्मद सिराज – ट्रॅव्हिस हेडमध्ये राडा, शब्दयुद्धाचा व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS: बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) शानदार

  • Written By: Last Updated:

IND vs AUS: बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) शानदार शतक झळकावले आहे. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) या डे- नाईट कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने शतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली होती. 140 धावांवर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) त्याचा डाव संपवला पण त्यानंतर सिराज आणि हेडमध्ये शब्दयुद्ध पाहायला मिळाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेडने 141 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 140 धावा केल्या. हेडने 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे डे- नाईट कसोटी सामन्यातील सर्वात जलद शतक आहे. शतक पूर्ण झाल्यानंतर हेड आक्रमक फलंदाजी करत होता. सिराजने एका यॉर्कर चेंडूने त्याला बोल्ड करत हेडला बाहेर जाण्याचा इशारा केला तसेच हेडसाठी काही शब्द देखील सिराजने वापरले त्यानंतर हेडने देखील सिराजला प्रत्युत्तर देत सिराजला पोहून काही शब्द वापरले. दोघांमध्ये सुरु असलेला शाब्दिक युद्ध पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सिराजसाठी अपशब्द वापरू लागले.

तर दुसरीकडे हेडने या सामन्यात शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हेडने डे- नाईट कसोटीमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने ने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. हेडने 2022 मध्ये होबार्टमध्ये इंग्लंडविरुद्ध 112 चेंडूत शतक झळकावले होते.

Abu Azmi : अजित पवारांची मोठी खेळी, अबू आझमी ‘मविआ’ तून बाहेर

तसेच हेड आता डे- नाईट कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत हेडने डे- नाईट कसोटीमध्ये तीन शतके झळकावली आहेत. हेडच्या या खेळीच्या जोरावर भारताच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या आणि भारतावर 157 धावांची आघाडी घेतली आहे.

follow us