Download App

MS Dhoni: माहीच्या आयुष्यावर नवा सिनेमा; कोण साकारणार धोनीचा रोल? चाहते उत्सुक

MS Dhoni: क्रिकेट विश्वात एमएस धोनीचा (MS Dhoni) चाहता वर्ग मोठा आहे. त्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये माहीची गणना होते. (New Movie) धोनी म्हणजेच चाहत्यांचा लाडका माही स्वत:हा उत्तम फिनिशरच आहे. (MS Dhoni Mr And Mrs Mahi) परंतु दुसऱ्यांकडून उत्तमप्रकारे  कामगिरी करुन घेण्याचा गुण सुद्धा माहीमध्ये चांगलाच आहे.

यामुळे क्रिकेट विश्वातीचल चणाश, हुशार कर्णधारांमध्ये माहीची पहिली गणना होते. धोनी क्रिकेटच्या मैदानावर होता, त्यावेळी ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा प्रदर्शित झाला. आता माहीच्या आयुष्यावर दुसरा सिनेमा येत आहे. माही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो फक्त आयपीएलमध्ये खेळत असल्याचे दिसून येत आहे. माही आता अगोदरसारखा फार क्रिकेट खेळत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु क्रिकेट प्रेमींवर त्याची चांगलीच जादू असल्याचे अजूनही दिसून येत आहे.

यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये माहीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) विजेतेपद मिळवले आहे. हे सीएसकेच पाचव विजेतेपद आहे. आता माहीच्या आयुष्यावर दुसरा सिनेमा येत आहे. ‘मिस्टर एंड मिसेस माही’ या सिनेमाचं नाव आहे. शरण शर्मा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. राजकुमार राव व जान्हवी कपूर यांची या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे. १५ मार्च २०२४ दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जान्हवी कपूर ही महीमा म्हणजे साक्षी धोनीची भूमिका साकारणार आहे.

Kangana Ranaut: पंगाक्वीनच्या ‘तेजस’ची रिलीज डेट समोर; झळकणार नव्या भूमिकेत 

या सिनेमातून पुन्हा एकदा माहीचा प्रवास मांडण्यात येणार आहे. माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. करण जोहरची कंपनी या सिनेमाची निर्मिती करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज