Kangana Ranaut: पंगाक्वीनच्या ‘तेजस’ची रिलीज डेट समोर; झळकणार नव्या भूमिकेत 

Kangana Ranaut: पंगाक्वीनच्या ‘तेजस’ची रिलीज डेट समोर; झळकणार नव्या भूमिकेत 

Kangana Ranaut Tejas Release Date : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या ती ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru)या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आली आहे. दरम्यान तिच्या ‘तेजस’ (Tejas) या बहुचर्चित चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘तेजस’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यासोबत एक खास पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये पंगाक्वीन एका वैमानिकेच्या (pilot) भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


पंगाक्वीनने या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत या सिनमची माहिती दिली आहे. तसेच हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याचा सन्मान. २० ऑक्टोबरला ‘तेजस’ प्रदर्शित होणार अशी पोस्ट यावेळी पंगाक्वीनने केली आहे. ‘तेजस’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सर्वेश मेवाडा यांनी सांभाळली आहे. तर या चित्रपटात कंगना ही मुख्य भूमिकेत आहे, यावेळी पंगाक्वीनचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

‘तेजस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. आता येत्या २० ऑक्टोबरला हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘तेजस’ (Tejas Movie) हा चित्रपट वैमानिक तेजस गिल (Tejas Gill) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात कंगनाचा अॅक्शन मोड चाहत्यांना बघायला मिळणार आहे. पंगाक्वीनसह या चित्रपटात अंकुश चौहान, वरुण मित्रा आणि पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

पंगाक्वीन सध्या ‘तेजस’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत असली, तरीदेखील तिचे ‘चंद्रमुखी 2’ आणि ‘इमरजेन्सी’ हे दोन चित्रपट चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. ‘चंद्रमुखी 2’ हा पॅन इंडिया चित्रपट असून हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरेतर  सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना अभिनेत्रीसाठी खूप खास असणार आहे. ‘इमरजेन्सी’ या चित्रपटात पंगाक्वीन ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून आली आहे. पंगाक्वीनने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पंगाक्वीनच्या आगामी चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत  आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube