MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला (MS Dhoni) झटका देणारी बातमी आली आहे. धोनीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपतकुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर संपतकुमार (Sampath Kumar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर धोनीला चांगलाच दणका बसला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेवर धोनीला नोटीसही बजावली.
याआधी धोनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने संपतकुमार यांना पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. धोनीने संपतकुमार यांच्यासह अनेक पक्षांविरुद्ध दाखल केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली.
2013 मधील टी 20 प्रीमियर लीग स्पर्धेत धोनी बेटिंग आणि मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे धोनीने अनेक जणांविरुद्ध मानहानीचा आरोप करत याचिका दाखल केली होती. यानंतर सुनावणी झाली. संपतकुमार यांनी माफी मागावी असे सांगण्यात आले मात्र संपतकुमार यांनी माफी मागितली नाही.
T20 League : धोनी कोणावर लावणार कोट्यवधींची बाजी? जाणून घ्या, पडद्यामागच्या लिलावाचा खेळ