Download App

IND vs WI : ओपनिंगला उतरताच मुंबईकर रोहित आणि यशस्वीने 40 वर्ष जुना विक्रम मोडला

  • Written By: Last Updated:

Rohit Sharma And Yashasvi Jaiswal : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला. त्याचबरोबर या सामन्यात भारताचा 40 वर्षे जुना विक्रम मोडला. या सामन्यात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (Mumbaikars Rohit and Yashasvi broke the 40-year-old record as soon as they got to the opening)

रोहित शर्मा आणि जैस्वाल यांनी सलामी देताच भारताचा कसोटी क्रिकेटमधील 40 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. कसोटी सामन्यात, 1983 मध्ये रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर या दोन मुंबईकरांनी भारतासाठी ओपनींग केली होती. आता जैस्वालसोबत रोहित शर्माही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.

आता रोहित आणि यशस्‍वीने या 4 दशकांच्‍या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 1983 चा हा कसोटी सामना कराचीत खेळला गेला होता. रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या सामन्यात मुंबईकडून खेळणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह एकूण चार खेळाडू भारताकडून खेळत आहेत. उर्वरित दोन खेळाडू उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आहेत.

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारत मजबूत स्थितीत

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. अश्विनने संघाकडून पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा 30 आणि यशस्वी जैस्वाल 40 धावा करून नाबाद माघारी परतले. टीम इंडिया आता फक्त 70 धावांनी मागे आहे.

Tags

follow us