Download App

नीरजचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं; डायमंड लीग स्पर्धेत ठरला रौप्यपदकाचा मानकरी

Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय म्हणून नावारुपास आलेल्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) डायमंड लीग चॅम्पियन (Diamond League Final) बनण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजला दुसरा क्रमांक मिळाला. शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भाला फेकला. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली पण, त्याला विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच याने 84.24 मीटरचा थ्रो करत विजेतेपद पटकावले. तर फिनलँडच्या ऑलिव्हर हेलँडर याने 83.74 मीटर थ्रो करत तिसरा क्रमांक मिळवला.

आशिया कप महामुकाबला; कोण होणार चॅम्पियन? कोणाचे पारडे जड

या स्पर्धेतील नीरजचा पहिला थ्रो फाऊल गेला. दुसऱ्या वेळी त्याने 83.80 मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला 81.37 मीटर अंतरावर भाला फेकता आला. चौथ्या वेळी पुन्हा फाऊल झाला. पाचव्या प्रयत्नात त्याने 80.47 मीटरवर भाला फेकला. सहाव्या थ्रोमध्ये 80.90 मीटर अंतरावर भाला फेकला. या सहा प्रयत्नात दुसऱ्या थ्रो वेळची त्याची कामगिरी उत्तम राहिली मात्र यामुळे त्याला विजयी होता आले नाही. त्याला दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेच याने 84.27 मीटर अंतर पार करून पहिला क्रमांक मिळवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नांत 83.80 मीटर भालाफेक केली. मात्र त्यानंतर नीरजचा कोणताच प्रयत्न यशस्वी ठरला नाही. नीरज जर विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला असता तर तो जगातील तिसर भालाफेकपटू ठरला असता. पण, तसे होऊ शकले नाही. मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात नीरज चोप्राने ज्युरिखमध्ये डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकली होती. यावेळी मात्र या पराक्रमाची पुनरावृत्ती त्याला करता आली नाही.

Tags

follow us