NZ vs PAK T20I Series : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. तर दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळत आहे. 16 मार्चपासून पाकिस्तानसोबत न्यूझीलंड घरच्या मैदानावर पाच टी-20 सामन्यांची मालिका (NZ vs PAK T20I Series) खेळणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघात मोठे बदल केले आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला कर्णधार देखील बदलला आहे. तसेच आणखी सात खेळाडूंना बाहेरचा रास्ता दाखवला आहे.
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) जागी मायकेल ब्रेसवेलला (Michael Bracewell) संघाची कमाड दिली आहे. कर्णधार मिचेल सँटनर आणि न्यूझीलंडचे आठ खेळाडू आयपीएल खेळणार असल्याने न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आठ बदल केले आहे. पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 16 मार्चपासून सुरु होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मायकेल ब्रेसवेलने शानदार कामगिरी केली होती. तर दुसरीकडे या मालिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब जिंकणारा रचिन रवींद्र (Rachin Ravindra) देखील खेळताना दिसणार नाही.
न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका 16 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना क्राइस्टचर्च येथे होणार आहे तर दुसरा सामना 18 मार्च रोजी ड्युनेडिन येथे, तिसरा सामना 21 मार्च रोजी ऑकलंड, चौथा सामना तौरंगा येथे 23 मार्च रोजी आणि पाचवा सामना 25 मार्च रोजी वेलिंग्टन येथे होणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फौल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ’रोर्क, टिम रॉबिन्सन, बेन सीयर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.
टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
16 मार्च: पहिला टी-20 सामना: हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
18 मार्च: दुसरा टी-20 सामना : ओटागो विद्यापीठ, ड्युनेडिन
21 मार्च: तिसरा टी-20 सामना: ईडन पार्क, ऑकलंड
23 मार्च: चौथा टी-20 सामना : बे ओव्हल, तौरंगा
VIDEO : ‘तुला सोडणार नाही…’ संदीप क्षीरसागर यांचा नायब तहसीलदारांना दम, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
25 मार्च: पाचवा टी-20 सामना : स्काय स्टेडियम, वेलिंग्टन