Download App

थरारक सामन्यात विंडीजचा पराभव, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक; दक्षिण आफ्रिकेला भिडणार

महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने वेस्टइंडिज संघाचा पराभव केला. वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव

West Indies vs New Zeland Match Report : महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने वेस्टइंडिज संघाचा पराभव केला. या सामन्यात वेस्टइंडिजला फक्त 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर न्यूझीलंड संघाने फायनलमध्ये धडक दिली असून येथे अंतिम लढत दक्षिण आफ्रिका संघाशी होणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 ओव्हर्समध्ये 128 धावा केल्या होत्या. प्रतिस्पर्धी वेस्टइंडिजला मात्र हे माफक आव्हानही पार करता आलं नाही. वेस्टइंडिजला 120 धावाच करता आल्या.

पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता न्यूझीलंडने वेस्टइंडिजचा (New Zeland vs West Indies) पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजल्यापासून सुरू होईल.

Woman T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. जॉर्जिया प्लिम्बरने सर्वात जास्त 33 धावा केल्या. सूजी बेट्स 26, ब्रूक हॉलिडे 18 तर इसाबेला गेजने 20 धावा केल्या. वेस्टइंडिजकडून डेन्ट्रा डॉटिनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एफी फ्लेचर 2 तर करिश्मा रामचरक आणि आलियाह एलियेने यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्टइंडिजचीही सुरुवात खराब झाली. नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. डेन्ट्रा डॉटिनने सर्वाधिक 33 धावा केल्या. एफी फ्लेचर 17 आणि हॅली मॅथ्यूजने 15 धावा केल्या. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. न्यूझीलंडच्या एडेन कार्सेनने तीन विकेट्स घेतल्या. अमेलिया केरने दोन तर फ्रेन जोनास, लीहा ताहुहू, सूजी बेट्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Women’s T20 World Cup : भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सामना

follow us