Download App

आयपीएल दरम्यान क्रिकेट विश्वात खळबळ, 9 किलो गांजासह ‘या’ खेळाडूला अटक

Nicholas Kirton : एकीकडे क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग सुरु असून दुसरीकडे क्रिकेट जगातून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Nicholas Kirton : एकीकडे क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग सुरु असून दुसरीकडे क्रिकेट जगातून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार पोलिसांनी एका खेळाडूला तब्बल 9 किलो (20 पौंड) गांजासह ताब्यात घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडा क्रिकेट संघाचा कर्णधार निकोलस किर्टनला (Nicholas Kirton) पोलिसांनी 9 किलो गांजासह ताब्यात घेतले आहे.

बार्बाडोसमधील ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Grantley Adams International Airport) निकोलस किर्टनला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. या प्रकरणात जमैका ग्लीनरने दिलेल्या वृत्तानुसार, निकोलस किर्टन सध्या पोलीस कोठडीत असून या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येत आहे. कॅनेडियन कायद्यानुसार, 57 ग्रॅम पर्यंत गांजा बाळगणे हा गुन्हा मानला जात नाही, परंतु लोक सार्वजनिक ठिकाणी गांजा घेऊ जाऊ शकत नाही.

क्रिकेट कॅनडाने दिले स्पष्टीकरण

तर दुसरीकडे या प्रकरणात कॅनडा क्रिकेट बोर्डाने (Cricket Canada) एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेट कॅनडाला राष्ट्रीय संघाचा खेळाडू निकोलस किर्टन यांच्याशी संबंधित अलिकडच्या आरोपांची आणि अटकेची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आम्ही लक्ष देऊन आहोत. या प्रकरणात पुढील तपशील उपलब्ध झाल्यावर अपडेट्स करण्यात येईल अशी माहिती कॅनडा क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

क्रिकेट कॅनडाने पुढे म्हटले आहे की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना, आम्ही चाहत्यांना सांगू इच्छितो की, आमचा राष्ट्रीय पुरुष संघ आगामी उत्तर अमेरिकन कपच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. बार्बाडोसमध्ये जन्मलेले निकोलस किर्टन कॅनडाला जाण्यापूर्वी वेस्ट इंडिज अंडर-19 आणि बार्बाडोससाठी क्रिकेट खेळत होता. त्याने कॅरिबियन प्रीमियर लीग 2020 मध्ये जमैका तल्लावाहसाठी 3 सामने देखील खेळले आहे. तर निकोलस किर्टनने कॅनडासाठी 21 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत.

कर्मचाऱ्यांना दिलासा, आता PF चे पैसे सहज निघणार, ‘हे’ नियम बदलले

तर दुसरीकडे उत्तर अमेरिका कप 18 एप्रिल रोजी केमन बेटांवर सुरू होणार आहे. यामध्ये कॅनडा, बहामास, बर्म्युडा, केमन बेटे आणि अमेरिका सहभागी होणार आहे.

follow us

संबंधित बातम्या