PAK vs BAN: रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) 10 विकेट्सने पराभव करत बांगलादेश (Bangladesh) इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानाला दुसऱ्या डावात अवघ्या 146 धावांवर गुंडाळले.
या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) 3 विकेट्स घेत नवीन विक्रम केला आहे. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम न्युझीलंडच्या (New Zealand) डॅनियल व्हिटोरीच्या (Daniel Vettori) नावावर होता.
बांगलादेशसाठी आतापर्यंत शाकिब अल हसनने 444 सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने 3.91 च्या इकॉनॉमीसह 707 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोत्तम कामगिरी 10/124 अशी आहे. तर डॅनियल व्हिटोरीने आपल्या कारकिर्दीत 442 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे आणि त्याने या दरम्यान 3.14 च्या इकॉनॉमीसह 705 विकेट घेतल्या होत्या. तर दुसरीकडे पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शकीब अल हसनने पहिल्या डावात 15 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तर पहिल्या डाव्यात 1 विकेट आणि दुसऱ्या डाव्यात गोलंदाजी करताना शाकिबने 4 विकेट्स घेतल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज
शाकिब अल हसन : 707 विकेट्स
डॅनियल व्हिटोरी : 705 विकेट्स
रवींद्र जडेजा : 568 बळी
रंगना हेरथ : 525 विकेट्स
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे, आदिती तटकरेंची मोठी घोषणा
सनथ जयसूर्या : 440 विकेट्स