Download App

‘या’ पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम, 2 सामन्यात 12 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ठरला पहिला खेळाडू

PAK vs NZ : न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत पाकिस्तान संघाचा तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0  ने पराभव केला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या

  • Written By: Last Updated:

PAK vs NZ : न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत पाकिस्तान संघाचा तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0  ने पराभव केला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा 43 धावांनी (PAK vs NZ) पराभव केला मात्र या सामन्यात पाकिस्तानच्या सुफियान मुकीमने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुफियान मुकीम (Sufiyan Muqeem) सलग दोन  सामन्यात 12 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने 42 षटकांत 2 बाद 264 धावा केल्या. यानंतर, पाकिस्तान संघ 40 षटकांत 221 धावांवर सर्वबाद झाला आणि 43 धावांनी सामना गमावला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तानी खेळाडू सुफियान मुकीम 12 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याआधी तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 12 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 व्या क्रमांकावर फलंदाजी

सुफियान मुकीमने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 व्या क्रमांकावर फलंदाजी  करत  एक विश्वविक्रम रचला आहे. तो एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सलग दोन सामन्यांमध्ये 12 व्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा पहिला खेळाडू ठरला.  न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सुफियान मुकीम संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता पण सब्सटिट्यूट खेळाडूला दुखापत झाल्यामुळे त्याला शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 12 व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली.

जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर , आई किम फर्नांडिसने घेतला जगाचा निरोप

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावताना इमाम-उल-हकला (Imam ul Haq) जबड्याला दुखापत झाली आणि तो या सामन्यातून बाहेर पडला. त्याच्या जागी उस्मान खानचा (Usman Khan) समावेश पाकिस्तानच्या संघात करण्यात आला.  ज्याने 17 चेंडूत 12 धावा केल्या. सुफियान 12 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 6 चेंडूत 2 धावा केल्या.

follow us