Pakistan beat South Africa : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी मात्र पाकिस्तान संघाने (Champions Trophy 2025) जोरदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या (South Africa) विशाल आव्हानाचा पाठलाग करत आफ्रिकेचा पराभव केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात मालिका सुरू आहे.
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या गाठली. या सामन्यात पाकिस्तानने 355 धावांचे लक्ष्य गाठले. पाकिस्तानसाठी हे सर्वात मोठे आव्हान होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 50 ओव्हर्समध्ये 352 धावा केल्या. या दरम्यान हेनरिक क्लासेनने 56 चेंडूत 87 धावा केल्या. ब्रीट्जकेने 83 तर कर्णधार टेम्बा बावुमाने 82 धावा केल्या.
टीम इंडियाला धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रित बुमराह आऊट; ‘या’ खेळाडूला लॉटरी..
या अशक्य वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचे फलंदाज मैदानात उतरले. विशेष म्हणजे पाकिस्तानी संघाने 49 ओव्हर्समध्येच लक्ष्य गाठले. सातव्या ओव्हरमध्येच बाबर आझमच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यावेळी 57 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दहाव्या ओव्हरमध्ये सऊद शकील बाद झाला. नंतर पुढील ओव्हरमध्ये फखर झमान बाद झाला. दोन विकेट लवकर पडल्याने पाकिस्तानचा संघ दडपणात आला होता.
परंतु कर्णधार रिजवान आणि सलमान अली आगा या दोघांनी 229 चेंडूत तब्बल 260 धावांची भागीदारी केली. या अभेद्य भागीदारीमुळेच अशक्य वाटणारा हा सामना जिंकता आला. 49 व्या ओव्हरमध्ये सलमान आगा बाद झाल्यानंतर ही भागीदारी तुटली. सलमानने 103 चेंडूत 134 तर कर्णधार रिजवानने 128 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.
दरम्यान, येत्या 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तानचा संघ फॉर्मात दिसत आहे. ही भारतासाठी आव्हानात्मक परिस्थिती ठरू शकते. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. यातच भारतीय संघात मॅचविनर गोलंदाज जसप्रित बुमराह नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.
टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..