टीम इंडियाला धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रित बुमराह आऊट; ‘या’ खेळाडूला लॉटरी..
![टीम इंडियाला धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रित बुमराह आऊट; ‘या’ खेळाडूला लॉटरी.. टीम इंडियाला धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रित बुमराह आऊट; ‘या’ खेळाडूला लॉटरी..](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/11/F_TOkB7XoAArds-_V_jpg--1280x720-4g.webp)
Jasprit Bumrah Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा यंदा पाकिस्तानात होणार आहेत. या स्पर्धेआधीच भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह संघात दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला आहे. अजूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे बुमराह संघाबाहेर राहणार आहे. बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे. मागील काही सामन्यांत हर्षितने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे.
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे इंग्लंड विरूद्धच्या सिरीजमध्येही त्याला खेळता आले नव्हते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही बुमराह दिसणार नाही. बंगळुरूत त्याची तपासणी करण्यात आली होती. मात्र यात त्याला कोणतीही गंभीर समस्या दिसली नव्हती. परंतु, सध्या तो गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. बीसीसीआयचे मेडिकल पथक बुमराहच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? या दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय
जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. ही त्याची दुसरी वेळ आहे. याआधी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या गेलेल्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत (T20 World Cup) पाठीच्या दुखण्याने बुमराहला संघाबाहेर बसावे लागले होते. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतून त्याला बाहेर पडावे लागले आहे.
बुमराहच्या जागी हर्षित, यशस्वीऐवजी वरुण
आयसीसीने सर्व आठ संघाना टीम घोषित करण्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीनंतर जर संघात बदल करायचा असेल तर टूर्नामेंटच्या तांत्रिक समितीकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. हर्षितने इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. दुसरीकडे यशस्वी जैस्वालऐवजी वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली आहे. बुमराह संघात कधी पदार्पण करील याची अद्याप काहीच माहिती नाही. काही आठवड्यात तो पळायला सुरुवात करील नंतर हळूहळू गोलंदाजीत वापसी करेल अशी शक्यता आहे.
हर्षित राणासाठी ड्रीम डेब्यू, पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर केला अनोखा विक्रम!