Download App

पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी पात्र अन् बीसीसीआयचं वाढणार टेन्शन; जाणून घ्या कारण

Pakistan Women Team : आयसीसी महिला विश्वचषक 2025 साठी आज पाकिस्तान संघाने (Pakistan Women Team) आपले स्थान निश्चित केले आहे.

  • Written By: Last Updated:

Pakistan Women Team : आयसीसी महिला विश्वचषक 2025 साठी आज पाकिस्तान संघाने (Pakistan Women Team) आपले स्थान निश्चित केले आहे. लाहोरच्या (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर थायलंडविरुध्द (Thailand) झालेल्या सामन्यात पाकिस्ताने शानदार कामगिरी करत आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये (ICC Women’s World Cup 2025) आपले स्थान निश्चित केले आहे.

या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने थायलंडवर 67 धावांनी विजय मिळावला. आयसीसी महिला विश्वचषक 2025 पात्रता स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने चारही सामने जिंकले आहे. या स्पर्धेत पाकिस्तानसह बांगलादेश, वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड आणि थायलंड या संघाचा समावेश होता. या स्पर्धेतील टॉप टू संघ आयसीसी महिला विश्वचषक 2025 साठी पात्र ठरणार आहे.

तर दुसरीकडे सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक 2025 साठी पाकिस्तानच्या संघाने प्रवेश निश्चित केल्याने आता या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. जर पाकिस्तानने या स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला तर बीसीसीआयला (BCCI) पाकिस्तान संघाचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने पाकिस्तामध्ये जाण्यास नकार दिल्याने बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये तटस्थ स्थळ करार करण्यात आला होता. या करारानुसार दोन्ही संघ एकमेकांच्या देशात न जाता तटस्थ स्थळी सामने खेळणार.

दोन्ही बोर्डामध्ये झालेल्या करारानुसार आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 (भारतामध्ये होणाऱ्या) आणि आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 (भारत आणि श्रीलंकामध्ये होणाऱ्या) आणि 2028 मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (पाकिस्तानमध्ये होणाऱ्या) सारख्या आगामी स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आपले आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार.

फायनल आणि सेमीफायलन भारता बाहेर होणार?

आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये पाकिस्तान संघाचे सामने तटस्थ ठिकाणी होणार असल्याने जर पाकिस्तानचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल किंवा फायनलमध्ये प्रवेश केला तर दोन्ही सामने बीसीसीआयला भारताबाहेर आयोजित करावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर व्यवस्थापनाच्या समस्याही वाढल्या आहे.

लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोटी खर्च, योजना बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माहितीनुसार बीसीसीआयने या स्पर्धेच्या अंतिम सामनेसाठी मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा विचार करत आहे. तर दुसरीकडे मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे या स्पर्धेचे सामने आयोजित करण्यत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us