Download App

सेमी फायनलमध्ये पराभव, तरीही पदक जिंकणार लक्ष्य सेन, जाणून घ्या कसं

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) नवव्या दिवशी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) उपांत्य

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) नवव्या दिवशी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. या पराभवानंतर लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाहेर झाला आहे. उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसनने (Victor Axelsen) सेनचा पराभव केला. व्हिक्टरने हा सामना 22-20, 21-14 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर देखील लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकू शकते.

पदक जिंकण्याची संधी

उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर लक्ष्यला अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. याच कारण म्हणजे ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंमध्ये कांस्यपदकाची लढत होते. त्यामुळे त्याला भारतासाठी पदक जिंकण्याची एक संधी मिळणार आहे.

यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात विजय मिळवून भारतासाठी पदक जिंकला होता.

तर आता हीच संधी लक्ष्य सेनला ही मिळणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी त्याचा सामना मलेशियाच्या ली जी जियाशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी आतापर्यंत सर्व पदके महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. त्यामुळे आता लक्ष्य सेनकडे आता एक सुवर्णसंधी आहे.

राजधानीत मराठीचा आवाज घुमणार, 70 वर्षांनी दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन

पराभवानंतर लक्ष्य काय म्हणाला?

सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर लक्ष्य सेन म्हणाला की, तो या सामन्यात अधिक आक्रमक खेळ करू शकला असता. विक्टरने पहिल्या गेमपासून आक्रमण करायला सुरुवात केली तर मी खूप जास्त डिपेन्समध्ये खेळलो. मी आणखी थोडा आक्रमक खेळ खेळून हा सामना जिंकू शकत होतो. असं लक्ष्य सेन म्हणाला.

follow us