Download App

Paris Olympics 2024 मध्ये लक्ष्य सेनकडून मोठा उलटफेर, जोनाथन क्रिस्टीला धक्का, प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश!

Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) पाचव्या दिवशी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) मोठा उलटफेर

  • Written By: Last Updated:

Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) पाचव्या दिवशी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) मोठा उलटफेर करत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा (Jonathan Christie) पराभव करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये शानदार एन्ट्री केली आहे.

या सामन्यात लक्ष्यने पहिला गेम 21-18 असा जिंकला तर दुसरा गेम 21-12 असा जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. लक्ष्य ने पहिला गेम 28 मिनिटांत आणि दुसरा गेम 23 मिनिटांत जिंकून जोनाथन क्रिस्टीसह सर्वांना धक्का दिला.

तर दुसरीकडे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही (P.V. Sindhu) आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. तिने आपल्या दुसऱ्या सामन्यात आज इस्टोव्हाच्या क्रिस्टिन कुबाचा (Kristin Kuba) सहज पराभव केला आहे. सिंधूने क्रिस्टिनचा 21-5, 21-10 असा पराभव केला.

पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीत सामन्यात पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेन विरुद्ध क्रिस्टीने 5-1 अशी आघाडी घेतली होती मात्र या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत लक्ष्यने हा सामना 8-8 ने बरोबरीत आणला. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिस्टीने सामन्यात पुनरागमन करत पहिला गेम 18-18 ने बरोबर केला मात्र त्यानंतर लक्ष्यने आघाडी घेतली आणि पहिला गेम 21-18 ने जिंकला.

ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज देताच दरेकर, मुनगंटीवारांसह दिग्गज नेते ढाल बनून मैदानात, म्हणाले, रावण कुणाचा…

तर दुसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा जोनाथन क्रिस्टीने आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत सेनने 10-5 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर ही आघाडी 13-9 अशी केली.आणि त्यानंतर दुसरा गेम 21-12 असा जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान निश्चित केले.

follow us