Download App

“देशासाठी पदक जिंकल्याचा आनंदच पण आता..” रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजनं काय सांगितलं?

नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी (Paris Olympics) घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे. नीरजच्या यशाने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलेच रौप्य पदक मिळाले आहे. एकूण सहा थ्रोपैकी नीरजचा केवळ दुसरा थ्रो लीगल ठरला. इतर सर्व थ्रो फॉऊल ठरले. त्याचवेळी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने नीरज चोप्राचे टोकियो ऑलिम्पिकमधील 87.58 चे रेकॉर्ड मोडून काढत सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीनंतर नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

olympics 2024 : नीरज चोप्राची पुन्हा कमाल! भारताला भालाफेकमध्ये रौप्य पदक

देशासाठी जेव्हाही पदक जिंकतो त्याचा आनंद नक्कीच होतो. पदकाची गोष्ट वेगळी आहे पण सुधारणा करण्याची वेळ आली आहे. ज्या कमतरता राहिल्या आहेत त्यात सुधारणा करू टीमसोबत बसून चर्चा करू. स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. गोल्ड, सिल्व्हर पदकांचा विचार करू नका. खेळाडू जे स्पर्धेत खेळले ते पूर्ण झोकून देऊन खेळले. याच पद्धतीतून बदल होत राहतात प्रत्येक वेळी पदक मिळेलच असं होत नसतं. पण पुढील काळात भारताच्या पदकांची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास नीरजने व्यक्त केला.

मला सुवर्णपदक मिळेल अशी देशवासियांची भावाना होती. याची जाणीव मलाही आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. काल अर्शद नदीमचा दिवस होता. मी मला जितंक सर्वोत्तम देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. आता आगामी काळात मी माझ्या खेळात नक्कीच सुधारणा करील असे नीरज चोप्राने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

चाललंय काय..! कुस्तीपटू अंतिम पंघालही अडचणीत; तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश

follow us