Download App

पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या पोरनं फडकावला तिरंगा; जाणून घ्या, कोण आहे ‘कांस्य’ जिंकणारा सरबज्योत सिंग

सरबज्योतने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. 2019 मध्ये त्याने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये दोन रौप्य आणि एक सुवर्ण जिंकले आहे.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics who Is Shooter Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) पुन्हा एकदा भारताचा तिरंगा गर्वाने फडकला आहे. शूटिंग रेंजमध्ये भारतीय नेमबाजांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली असून, भारतीय नेमबाज जोडीने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. यावेळी भारतीय नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत विजय मिळवला आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी देशासाठी कांस्यपदक जिंकले आहे. या दोघांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या नेमबाजांचा पराभव केला. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मात्र, मनू भाकरसोबतच भारताच्या शिरपेचात तुरा रोवणारा तिचा सहकारी सरबज्योत सिंग नेमका कोण आहे. याबद्दल जाणून घेऊया.

इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत; भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

सरबज्योत सिंग शेतकऱ्याचा मुलगा

सरबज्योत सिंगचा जन्म अंबाला येथील बरारा येथे झाला असून त्याचे वय केवळ 22 वर्षे आहे. सरबज्योतचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत तर, आई हरदीप कौर गृहिणी आहे. सरबज्योतने अंबाला कँटमधील एआर शूटिंग अकादमीमध्ये शूटिंगचे प्रशिक्षण घेतले असून, प्रशिक्षक अभिषेक राणा यांनी त्याला प्रशिक्षित केले आहे.

सरबज्योतला जिंकण्याची सवय 

सरबज्योत सिंगला खेळामध्ये जिंकण्याची जुनी सवय आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये ISSF ज्युनियर विश्वचषक जिंकला होता. 2021 मध्ये त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. 2023 मध्येही त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवत पदार्पणातच कांस्यपदकाला गवसलणी घातली.

टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

सरबज्योतमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची ताकद 

ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग केवळ 22 वर्षांचा आहे त्यामुळे आगामी काळात  तो भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकतो. सरबज्योतने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. 2019 मध्ये त्याने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये दोन रौप्य आणि एक सुवर्ण जिंकले आहे. याशिवाय त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.  2019 दोहा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले असून, 2023 मध्ये त्याने चगवॉनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. 2022 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

follow us