Download App

Paris Paralympics : भारताची गोल्डन गर्ल! स्वतःचाच रेकॉर्ड मोडत अवनीने मिळवले गोल्ड

पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.

  • Written By: Last Updated:

Avani Lekhara shoots 2nd gold with new Paralympic record : पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताने दोन पदके जिंकली आहेत. महिला नेमबाजांनी भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेती अवनी लेखारा हिने पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे, तर भारताची दुसरी नेमबाज मोना अग्रवाल हिने कांस्यपदक जिंकले आहे. दोन्ही नेमबाजांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल SH1 प्रकारात पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. अवनीने टोकियोमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.

 

स्वतःचा रेकॉर्ड काढला मोडीत 

अवनी लेखरा वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तेथे तिने अंतिम फेरीत २४९.६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले आणि पॅरालिम्पिकचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनीने २४९.७ गुण मिळवत स्वतःचा विक्रम मोडीत काढत पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

अशी आहे अवनीची कहाणी

अवनीचा सुवर्ण पदक मिळवण्यापर्यंतचा प्रवास वाटतो तिसका सोपा नाहीये. अवनीचा 20 फेब्रुवारी 2012 साली रस्ते अपघात झाला होता. तिचे कुटुंब जयपूरहून राजस्थानमधील ढोलपूरला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यात अवनीच्या पाठीच्या कण्याला इजा झाली होती. ही इजा इतकी गंभीर होती की, यात तिच्या कमरेच्या खालच्या भागाने पूर्णपणे काम करणे बंद केले.

अपघातानंतर अवनी दोन वर्षे घरीच होती. त्यानंतर अवनीने व्हीलचेअरवर बसून शाळेत जायला सुरुवात केली. याच काळात अवनीच्या वडिलांनी तिची नेमबाजीशी ओळख करून दिली. पण अवनीला यात फारसा रस नव्हता. शिवाय खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी आणि रायफल धरण्यासाठी ताकद नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे पॅरा शूटिंग कोच नव्हता. याच काळात अवनीने अभिनव बिंद्राचे अ शॉट ॲट हिस्ट्री: माय ऑब्सेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड हे आत्मचरित्र, वाचले आणि तेथूनच खऱ्या प्रवासाला सुरूवात झाली.

follow us