World Cup 2023 Final: सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता (World Cup Final) बनला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आठवेळा वर्ल्डकपची फायनल खेळली, त्यापैकी विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला 3 विकेट झटपट पडल्यावर कांगारू दडपणाखाली आले होते पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मैदानावर राहुन सामना एकतर्फी केला. अशा प्रकारे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले.
मात्र याच विक्रमी विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने ट्रॉफीसोबत मैदानावर फोटोसेशन केले. त्यानंतर खेळाडूंनी कुटुंबियांसोबतही फोटोसेशन उरकले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जंगी पार्टीही झाली. याच दरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात ऑस्ट्रेलियन प्लेअर मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बिअर पित निवांत पहुडलेला दिसून येत आहे. त्याच्या या फोटोवरुन क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. (photo of Australian player Mitchell Marsh drinking beer with his feet on the World Cup trophy has gone viral)
Mitchell Marsh with the World Cup. pic.twitter.com/n2oViCDgna
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 20, 2023
नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केले आहे. सहा ट्रॉफी जिंकल्याने ऑस्ट्रेलियाला आता ट्रॉफीची किंमत राहिलेली नाही, अशी टीका क्रिकेटप्रेमी करत आहेत. तर काहींनी खेळाची इज्जत केली तर खेळ तुमची इज्जत ठेवतो, अशी टीका केली आहे. याशिवाय काहींनी त्या ट्रॉफीसाठी घेतलेल्या कष्टाची आठवण करुन देत त्या कष्टाचा तरी सन्मान ठेवा, आदर करा, असा सल्ला कांगारुंच्या टीमला दिला आहे. तर काहींनी हा माज त्यांनी कामगिरीतून कमावला आहे, ते उन्माद करणारच अशी कमेंट केली आहे.
भारतीय फलंदाज अपयशी ठरले :
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजांने भारताला 240 धावांत गुंडाळले. राहुल (107 चेंडूत 66 धावा, एक चौकार) आणि कोहली (63 चेंडूत 54 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करून भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नियमितपणे भारताला धक्के दिले. यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली नाही. अखेरीस 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संपूर्ण टीम विश्वचषकात प्रथमच ऑलआऊट झाली. त्यानंतर सुरुवाचे तीन धक्के ऑस्ट्रेलियाला लागोपाठ बसले. पण प्रेशर न येऊ देता खेळत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप उंचावला.