Download App

… म्हणून मी क्रिकेट सोडणार होतो; अश्विनकडून करिअरच्या कठीण काळाबाबत खुलासा

R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) यांने नुकत्याच त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण काळाबाबत एक मोठा खुलासा केला. यावेळी अश्विनने सांगितलं की 2017 मध्येच आपण क्रिकेट सोडून एमबीए करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 2017 पर्यंत अश्विन क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमचा प्रमुख सदस्य होता. मात्र 2017 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ( Champions Trophy Final ) पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर अश्विनच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला. या फायनलमध्ये अश्विनने 70 रन काढत एकही विकेट घेऊ शकला नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर त्याला मर्यादित षटकांच्या संघातून वगळण्यात आलं होतं.

Government Schemes : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

नुकताच अश्विनने इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी तो बोलत होता अश्विन म्हणाला की, मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी स्वतःला विचारत होतो की जीवनात जे काही करायचं त्यामध्ये सर्वोच्च शिखर गाठायचे. मात्र या अपयशामुळे मला एमबीए मार्केटिंग करायचं होतं. तसेच तुम्हाला माझं कुटुंब आहे. मी पुन्हा कुटुंबाकडे परतू शकत होतो. पण क्रिकेट एक कॉर्पोरेट अफेअर सारखं आहे. ज्यामध्ये अनेक सरकारी आणि संस्थांचा हस्तक्षेप असतो.

गल्लीपासून-दिल्लीपर्यंत 52 निवडणुका हरले, तरीही सोलापूरच्या ‘स्वामीं’चा फडणवीसांवर विश्वास

तसेच त्यांनी यावेळी सांगितलं की, कसोटी क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विनी आपल्या वडिलांचे चर्चा केली होती. तेव्हा तो टेस्ट क्रिकेट देखील सोडणार होता मात्र सुदैवाने 2023 च्या वनडे वर्ल्ड कप साठी भारतीय टीमने त्याला कायम ठेवलं माझ्या आणि वडिलांचे नेहमी वाद होतात ते मला म्हणतात मी खूप साधा आणि सरळ आहे त्यामुळेच माझी स्थिती आहे.

एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर… विजयासाठी घाम गाळावा लागणार!

मी स्वतःला मजबूत समजत होतो. मात्र वडिलांच्या याच वक्तव्यांमुळे एक वेळ अशी आली की, मी स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतलं. कित्येक वेळ मी रडलो आहे. असा खुलासा यावेळी अश्विनने केला आहे. मात्र आता अश्विनच करिअर काहीस सुधारलं आहे. नुकतेच त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमधील शंभर कसोटी सामने खेळले आहेत. तर अनिल कुंबळे नंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

follow us