Government Schemes : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : राज्याच्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून एकत्रितपणे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme)सुरु करण्यात आली आहे. ही एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे. या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र सरकारकडून (Central Govt)दिली जाते. त्यानंतरच्या रोजगाराची हमी राज्य सरकार (State Govt)देते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात.
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर… विजयासाठी घाम गाळावा लागणार!
रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये काय?
– महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.
– या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंत केंद्र सरकारमार्फत रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. 100 दिवसानंतर राज्य शासनामार्फत रोजगार उपलब्ध करुन दिला जातो.
– या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या नागरिकांना अकुशल रोजगार पुरविला जातो.
– योजनेंतर्गत संपूर्ण कामकाज हे संगणीकृत असल्यामुळे सर्व कामकाज हे जलद आणि पारदर्शक पद्धतीने केले जाते.
– रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारा व्यतिरिक्त मजुरांना अन्य सुविधांचा देखील लाभ दिला जातो.
मोहिते पाटील-रामराजेंनी कितीही विरोध करु दे… भाजप रणजीतसिंहांना बदलणार नाही, कारण…
रोजगार हमी योजनेची यादी
समुदायासाठी मत्स्यपालनाचे तलाव बांधणे
समुदायासाठी मत्स्य पालन तलावाची दुरूस्ती
समुदायासाठी मत्स्यपालनाचे तलाव नूतनीकरण
समुदायासाठी समोच्च खंदक खंदकाचे
समुदायासाठी वितरक कालवा बांधणे
समुदायासाठी किरकोळ कालवा बांधणे
समुदायासाठी उप किरकोळ कालवा बांधणे
समुदायासाठी जल कोर्स बांधणे
समुदायासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्याच्या अस्तरीकरण
समुदायासाठी वितरण करणाऱ्या कालव्याच्या अस्तरीकरण
समुदायासाठी छोट्या कालव्याच्या अस्तरीकरण
समुदायासाठी उप-गौण कालव्याच्या अस्तरीकरण
समुदायासाठी जल कोर्स चे अस्तरीकरण कालवा कालवाची अस्टर
समुदायासाठी पाणी पुरवठा नूतनीकरण
समुदायासाठी वितरण करणाऱ्या कालव्याचे नूतनीकरण
समुदायासाठी किरकोळ कालव्यातील नूतनीकरण
समुदायासाठी उप- किरकोळ कालव्यातील नूतनीकरण
समुदायासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्याचे नुतणीकरण
समुदायासाठी वितरण करणाऱ्या कालव्याचे नूतनीकरण
समुदायासाठी किरकोळ कालव्यातील नूतनीकरण.
समुदायासाठी उप-किरकोळ कालव्यातील नूतनीकरण.
समुदायासाठी पाण्याचे कोर्स कालवा नूतनीकरण.
समुदायासाठी बांधण्यात आलेल्या तळ्याचे मजबूतीकरण
समुदायासाठी बांधण्यात आलेल्या तळ्याचे नूतनीकरण
समुदायासाठी भूमिगत बंधाऱ्याचे बांधकाम करणे.
समुदायासाठी पुरसंरक्षण भिंत बांधणे
वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामे
समुदायासाठी सिंचन विहीर
समुदायाच्या सिंचन विहिरीसाठी कठडा बांधणे व दुरूस्ती करणे.
सार्वजनिक विहिरीचे बांधकाम
वैयक्तिक लहान पाझर तलाव बांधणे
समुदायासाठी लहान पाझर तलाव बांधणे
समुदायासाठी लहान पाझर तलाव देखभाल / दुरूस्ती
समुदायासाठी पूर वळण बंधारा
अशी अनेकविध प्रकारची कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केली जातात.
जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता :
– अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
– अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
– अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
– अर्जदाराची अंग मेहनतीची कामे करण्याची तयारी असावी.
रोजगार हमी योजना मजुरी दर
वर्ष मजुरीचा दर (प्रतिदिवस)
2023 273/- रुपये
योजनेसाठी आवश्यक अटी :
– महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील मजुरांनाच रोजगार हमी योजनेचा लाभ दिला जातो.
– योजनेंतर्गत मजुरांना कमीत कमी 14 दिवस काम करणे आवश्यक आहे जर मजूर 14 दिवसांच्या आत रोजगार सोडत असेल तर अशा परिस्थिती त्याला मजुरीची रक्कम मिळणार नाही.
– अर्जदार मजूर शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक.
– नोंदणीशिवाय मजुरांना रोजगाराचा लाभ दिला जाणार नाही.
– रोजगार मिळवण्यासाठी जॉबकार्ड आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
-विहित नमुन्यात अर्ज
– जॉबकार्ड माहिती
– ग्रामसभेची मान्यता
– आधार कार्ड
– शिधापत्रिका
– ग्रामीण रहिवाशी दाखला
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– पासपोर्ट आकाराचे फोटो
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)