डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत मिळणार हक्काचं घर, राज्य सरकाकडून मोठी घोषणा
Mumbai Dabbawala : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर राज्य सरकारकडून (State Govt) निर्णयांचा धडका लावला जात आहे. आता सरकारने मुंबईतील डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabbawala) महत्त्वाचा निर्णय घेतला. डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) म्हाडाकडून (MHADA) हक्काचं घर देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. डबेवाल्यांसोबतच चर्मकार कामगारांनाही ही घरे दिली जाणार असल्याची घोषणा उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
Yek Number : ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष
डब्बेवाला, चर्मकारबांधवांना हक्काची घरे मिळणार! 🏠
मुंबईत 12,000 घरांची निर्मिती! 🏠मुंबई डब्बेवाला, चर्मकार असोसिएशन आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.… pic.twitter.com/I66pl0zWKz
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 13, 2024
काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या घराबाबत सभागृहात घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेनं आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शहा, प्रियांका होम्स रियल्टीचे रुद्र प्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला असोसिएशनचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असो. चे अशोक गायकवाड महाराज आदी उपस्थित होते. या बैठकीत डबेवाल्यांना घरे देण्याबाबत सामंजस्य करार संपन्न झाला.
चुकीचं लंगडं समर्थन करु नका, ‘त्या’ फोटोंवरून फडणवीसांनी आव्हाडांना सुनावलं
पंतप्रधान आवास योजनेंअतर्गत म्हाडाच्या माध्यमातून ही घरं मंजूर केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत डब्बेवाल्यांसाठी 12,000 घरे बांधली जाणार आहेत.
या योजनेंतर्गत मुंबईतील डब्बावाल्यांशिवाय चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनाही घरे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रिॲलिटी 30 एकर जमीन देणार आहे. नमन बिल्डर ही घरे ना नफा ना तोटा तत्त्वावर बांधणार आहे. 500 चौरस फुटांची 12 हजार घरे बांधली जाणार आहेत. येत्या3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे डब्बेवाल्यांसह चर्मकार कामगारांचे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
फडणवीस काय म्हणाले?
आज डब्बेवाले जागतिक झाले आहेत. त्यांच्यावर जगात संशोधन होत आहे. मात्र जागतिक झाले असतानाही त्यांनी आपले तत्व आणि निष्ठा सोडलेल्या नाहीत. म्हणूनच त्यांना हे हक्काचे घर मिळत आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत राज्य सरकार करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.