Download App

टीम इंडियातून पत्ता कट, आता ‘रणजी’तही नो एन्ट्री; श्रेयस अय्यरचं ‘बॅडलक’ कायम

Ranji Trophy Match Shreyas Iyer : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू (IND vs ENG Test Series) आहे. पाठदुखीच्या कारणामुळे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreys Iyer) या मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्यामागे हे सुद्धा एक कारण असावे असे सांगितले जात आहे. यानंतरही श्रेयसच बॅडलक सुरुच आहे. बाद फेरी अगोदर निश्चित झालेल्या मुंबईचा आसामविरुद्ध सामना आजपासून सुरू होत आहे. या सामन्यातही श्रेयस अय्यर दिसणार नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राष्ट्रीय संघात नसलेल्या सर्व खेळाडूंना रणजी सामन्यात (Ranji Trophy) खेळणे बंधनकारक केले आहे. मुंबई विरुद्ध आसाम हा सराव सामना आहे. शिवम दुबे (Shivam Dubey) या सामन्यात खेळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून संघात नसलेला माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील खेळणार आहे. दुसरीकडे मात्र श्रेयस अय्यर या सामन्यातही दिसणार नाही.

IND vs AUS : श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून बाहेर ? फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

याआधीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही श्रेयस फ्लॉप ठरला होता. या मालिकेतील सामन्यांतील 4 डावात त्याने फक्त 41 धावा केल्या. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांतही त्याला विशेष काही करता आले नाही. संघ व्यवस्थापनही त्याच्या कामगिरीवर नाराज होते. अशा परिस्थितीत त्याला संघाबाहेर जावे लागले. यासाठी त्याच्या पाठदुखीचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्याला खरंच पाठदुखीची समस्या आहे की खराब कामगिरी हेच त्यामागचे खरे कारण आहे याचा खुलासा अजून झालेला नाही.

रणजी ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाण (कर्णधार), शिवम दुबे, पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, अमोघ भटकळ, सूर्यांश शेडगे, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी आणि रॉस्टन डायस या खेळाडूंचा समावेश आहे.

अफगाणिस्तान मालिकेतून डच्चू, विश्वचषकातील एन्ट्रीही डळमळीत; ‘या’ 5 खेळाडूंचे भवितव्य धोक्यात

follow us