Bengaluru Stampede : गेल्या महिन्यात बेंगळुरु येथील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) मोठी कारवाई करत आरसीबीला (RCB) जबाबदार धरले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीकडून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. तर आता या घटनेला कॅटने आरसीबीला जबाबदार धरले आहे.
कॅटने जारी केलेल्या आदेशानुसार, आरसीबीने आयपीएल विजयानंतर अचानक सोशल मीडियावर रॅली काढण्यात येणार असल्याची पोस्ट केली होती. या पोस्टमुळे स्टेडियमबाहेर गर्दी जमली आणि पोलिसांना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळाला नाही. असं कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे.
परवानगीशिवाय सेलिब्रेशन
न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले आहे की आरसीबीने पोलिसांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नाही किंवा त्यांना माहिती दिली नाही. संघाने अचानक सोशल मीडियावर माहिती शेअर केली, ज्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली. आदेशात असेही म्हटले आहे की पोलिसांकडे फक्त 12 तासांचा वेळ होता, जो इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेसा मानला जाऊ शकत नाही.
तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांवर होणाऱ्या टिकेला कॅटने अन्याय म्हटले आहे. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस देखील माणसे आहे देव नाही किंवा जादूगर नाही. पोलिसांकडे अलाद्दीनचा दिवा नाही ज्याच्या मदतीने कोणतेही काम त्वरित पूर्ण करता येईल. या प्रकरणात अचानक पोलिसांकडे माहिती मिळाल्याने त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता त्यामुळे त्यांना दोष देता येणार असं कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे.
काॅंग्रेसला मोठा धक्का, कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश
IPS अधिकारी विकास कुमार यांना दिलासा
तसेच कॅटने या प्रकरणात आयपीएस अधिकारी विकास कुमार विकास यांचे निलंबन रद्द केले आहे. सरकारने या प्रकरणाच्या दोन दिवसांनंतर त्यांना निलंबित केले होते मात्र आता कॅटने आयपीएस अधिकारी विकास कुमार यांना मोठा दिलासा देत त्यांचा निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहे.