Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात झाली असून भारतीय संघाचे अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. आज भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. रोहित शर्माने या सामन्यात 8 षटकारांसह 94 चेंडूत 155 धावा केल्या आहे. रोहितने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने आजचा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे.
या सामन्यात सिक्कीमच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमने 50 षटकांत सात गडी गमावून 236 धावा केल्या. सिक्कीमकडून आशिष थापाने सर्वाधिक 79 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार शार्दुल ठाकूरने दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे, तनुश कोटियन, शम्स मुलानी आणि मुशीर खान यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. तर दुसरीकडे 237 धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार शतक झळकावले. रोहितने फक्त 27 चेंडूत अर्धशतक ठोकले तर 9 षटकारांसह 94 चेंडूत 155 धावा केल्या.
🚨 HUNDRED BY ROHIT SHARMA. 🚨
– A 62 ball century by the Hitman in the Vijay Hazare Trophy with 8 fours and 8 sixes.
THE NO.1 RANKED ODI BATTER AT THE AGE OF 38 IS SIMPLY DOMINATING…!!! 🇮🇳 pic.twitter.com/o6Jm1skEGI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2025
नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यात रोहितने अर्धशतके झळकावली होती. तर आता विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना शानदार शतक झळकावले आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा मुंबईकडून आणखी एक सामना खेळणार आहे. यानंतर तो न्युझीलंडविरुद्ध (INDvsNZ) होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात दाखल होणार आहे.
ठाकरे बंधूंनी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी फरक पडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीर
ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेत रोहित शर्मा मालिकावीर ठरला होता. त्याने तीन सामन्यात 200 हून अधिक धावा करत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकला होता.
