रोहित शर्माचे कर्णधारपद गेले; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलवर जबाबदारी

Shubman Gill-रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी शुभमन गिल (Shubman Gill) एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार आहे.

  • Written By: Published:
Shubman Gill named TeamIndia Captain for ODIs

India’s squad for Tour of Australia announced: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी शुभमन गिल (Shubman Gill) एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर सिराज, नितीश कुमार आणि ध्रुव जुरेल यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे संघाच कमबॅक झाले आहे.


हार्दिक पंड्याला संघातून वगळले

विशेष म्हणजे हार्दिक पंड्याला एकदिवसीय किंवा टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. आशिया कपमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीनंतरही त्याला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. आशिया कप दरम्यान त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.


वनडे मालिकेसाठी संघ भारतीय संघ

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल. (
India’s squad for Tour of Australia announced Shubman Gill named TeamIndia Captain for ODIs)


ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

follow us