भारतीय क्रिकेट संघात शुभमन पर्वाचा दबदबा; रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद जाण्याच्या मार्गावर
आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचं यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागणार आहे. (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे. मात्र, रोहित शर्मा याला कर्णधारपद सोडावं लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्याऐवजी शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाईल अशी चर्चा आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय संघाचा भाग असतील, परंतु कर्णधारपद गिलकडं जाऊ शकतं. हे भारतीय क्रिकेटविश्वातील मोठं स्थित्यंतर ठरणार आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना स्थान मिळणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू संघाचा आधारस्तंभ होते. मात्र, आता त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोघांना शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली आणि युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या भारतीय संघात खेळावे लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता अस्ताकडं चालली आहे.
जे झालं ते झालं, सुर्यकुमारने; अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! मोहसीन नक्वींनी मागितली माफी
ऑस्ट्रेलियावरुद्धची एकदिवसीय मालिका कदाचित त्यांची शेवटची संधी असू शकते. या शेवटच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संस्मरणीय कामगिरी करुन आपल्या कारकीर्दीचा गोड शेवट करतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते खेळू शकतील की नाही हे त्यांच्या परतीच्या फॉर्मवर अवलंबून असेल. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करेल. दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
19 ऑक्टोबर – पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)
पाच सामन्यांची टी 20 मालिका
29 ऑक्टोबर – पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर – दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर – तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर – चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर – पाचवी टी20 (ब्रिसबेन)