Rohit Sharma : पुढील महिन्यापासून सुरु होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआय (BCCI) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारी 19 पासून सुरु होणार आहे मात्र भारतीय संघाने सुरक्षेमुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan) जाण्यास नकार दिला होता त्यामुळे आता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल होणारं असून भारतीय संघ (Team India) या स्पर्धेत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या अपडेटनुसार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये जावे लागू शकते. याचे कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा कॅप्टन डे (Captain Day) . या इव्हेंटमध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघाच्या कर्णधारांना या स्पर्धेपूर्वी एकाच ठिकाणी एकत्र येऊन फोटो सेशन करावे लागते. त्यामुळे रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये जावे लागू शकते.
तर दुसरीकडे फोटो सेशन कुठे? होणार याबाबात आयसीसीने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण फोटो सेशन पाकिस्तानमध्ये झाले तर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि बीसीसीआय सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन डेसाठी रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 प्रथम भारतीय संघाची घोषणा होणार त्यानंतर रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे. राजकीय वादामुळे भारतीय संघाने 2008 नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
तर भारत – पाकिस्तानमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका भारतात 2012-13 मध्ये झाली होती. 2013 नंतर दोन्ही संघ एकमेकांविरोधात आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळतात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात? जरांगे पाटलांना संशय
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 23 फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे. तर या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी करणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी आणि न्यूझीलंडशी 2 मार्च रोजी सामना होणार आहे.