मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे. (Run machine Virat Kohli scored his historic 50th ODI century.)
सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 एकदिवसीय शतके झळकावली होती. किंग कोहली आपला 291 वा वनडे सामना खेळत आहे. यातच त्याने ऐतिहासिक 50 वे शतक झळकावले आहे. तर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वे शतक झळकावले आहे. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये 1 शतक झळकावले आहे.
याशिवाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर झाला आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने एका विश्वचषक सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. पण आता या विक्रमावर कोहलीचेही नाव कोरले आहे. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात कोहली हा एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला.
79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात न्यूझीलँडच्या संघाने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलँडने 5 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने चार सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मागील 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलँडचा पराभव करत टीम इंडियाचा (Team India) विजयी रथ रोखला होता.
भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.