Download App

WTC 2023-25 द. आफ्रिका अन् ऑस्ट्रेलियावर बक्षिसांचा वर्षाव, टीम इंडियासह 6 टीमही मालामाल

दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा पाच विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच आफ्रिकेच्या संघावर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे.

WTC 2025 Prize Money : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका (ICC WTC 2025 Prize Money) विजेता ठरला. आफ्रिकेच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव (South Africa vs Australia) करत करंडकावर नाव कोरलं. आपल्यावरील चोकर्सचा शिक्का पुसला आणि तब्बल 27 वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळही संपवला. लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) कांगारुंचा पाच विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच आफ्रिकेच्या संघावर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. उपविजेत्या ऑस्ट्रेलियाही (Australia Cricket) मालामाल झाला आहे. इतकेच नाही तर तिसऱ्या क्रमांकावरील टीम इंडियालाही (Team India) पैसे मिळणार आहेत.

या स्पर्धेत एकूण 9 टीम सहभागी होतात आणि त्यांच्या गुणांच्या आधारे दोन टॉप टीम फायनलमध्ये खेळत असतात. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विजयी झाला. आफ्रिकेला बक्षीस तर मिळणार आहेच पण त्याचबरोबर अन्य संघांनाही बक्षीसं मिळणार आहेत.

WTC Final आफ्रिकेने मारली बाजी; जाणून घ्या ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 3 मोठी कारणे

विजेता-उपविजेत्यावर पैशांचा वर्षाव

स्पर्धेतील विजेता संघ दक्षिण आफ्रिकेला 3.6 मिलियन यूएस डॉलर्स म्हणजेच 30.79 कोटी रुपये बक्षीस म्हणून (AUS vs SA) मिळाले आहेत. तर उपविजेच्या ऑस्ट्रेलिया संघाला 17.96 कोटी रुपये मिळाले आहेत. याआधी 2023 मध्ये ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने फायनल सामना जिंकला होता त्यावेळी संघाला 13.69 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच यावेळी पराभूत झाल्यानंतरही जास्त पैसे ऑस्ट्रेलियाला मिळाले आहेत हे विशेष.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 च्या (World Test Championship) सायकलमध्ये भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. टीम इंडियाला बक्षीस म्हणून 12.31 कोटी रुपये मिळणार आहेत. चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंड संघाला 10.26 कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरील इंग्लंडला 8.20 कोटी रुपये, सहाव्या क्रमांकावरील श्रीलंकेला 7.18 कोटी रुपये मिळणार आहेत.

पाकिस्तान मिळणार इतके पैसे

सातव्या क्रमांकावरील बांग्लादेशला 6.15 कोटी रुपये, आठव्या क्रमांकावरील वेस्टइंडिजला 5.13 कोटी रुपये तर सर्वात शेवट म्हणजेच नवव्या क्रमांकावरील पाकिस्तान क्रिकेट टीमला 4.10 कोटी (Pakistan Cricket) रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

बक्षीसाची रक्कम वाढवण्याचं कारण काय

आयसीसीने बक्षीसाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. क्रिकेट संघात स्पर्धा वाढावी त्यांनी चांगलं बक्षीस जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत हा यामागचा उद्देश होता. 2023-25 डब्ल्यूटीसी सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेने 69.44 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. ऑस्ट्रेलियाने 67.54 गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. 50 गुणांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

27 वर्षांचा दुष्काळ संपला…, दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन; पहा फोटो

follow us