WTC Final आफ्रिकेने मारली बाजी; जाणून घ्या ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 3 मोठी कारणे

WTC Final:  दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाला (Australia) धक्का देत लॉर्ड्सच्या

WTC Final

WTC Final :  दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाला (Australia) धक्का देत लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावरबाजी मारली आहे. या सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा (AUSVsSA) पाच विकेट्सने पराभव करत 27 वर्षांनंतर पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) ऑस्ट्रेलियाने 282 धांवाचा लक्ष्य ठेवला होता ज्याला या सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेने साध्य केले. ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी होती मात्र त्यांना जिंकता आले नाही. याची तीन कारणे जाणून घ्या.

दुसऱ्या डावात फलंदाजी कोसळली

या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 212 धावा केल्या होत्या तर त्यानंतर शानदार गोलंदाजी करत क्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांवर गुंडाळून 74 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोसळली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फक्त 73 धावांवर 7 विकेट्स गमावले होते. त्यानंतर अ‍ॅलेक्स कॅरी (43 धावा) आणि मिशेल स्टार्क (58 धावा) शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 207 पर्यंत आणले. मात्र जर वरच्या फलंदाजांनी काही धावा केल्या असत्या तर ऑस्ट्रेलिया आफ्रिकेला 350 पेक्षा जास्त धावांचा लक्ष्य देऊ शकला असता.

नॅथन लायनचा वापर कमी

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बॉल खूप फिरू लागला होता त्यामुळे एडेन मार्कराम आणि टेम्बा बावुमा हळूहळू खेळत होते मात्र ऑस्ट्रेलियन कर्णधाराने लायनला शॉर्ट स्पेल दिले. जर लायनला या सामन्यात जास्त गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली असती तर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपला दबाब निर्माण केला असता.

ब्रेकिंग : 27 वर्षांचा दुष्काळ संपला… ऑस्ट्रेलियाला धूळ चारत दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन

प्लेइंग इलेव्हन निवड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात कॅमेरॉन ग्रीनला फलंदाज म्हणून संधी दिली होती ज्यामुळे मार्नस लाबुशेनला डावाची सुरुवात करावी लागली त्यामुळे लाबूशेनला दोन्ही डावात फक्त 39 धावा करता आल्या, तर ग्रीनला 2 डावात फक्त चार धावा करता आल्या. लाबूशेनने जर नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती कर तो कदाचित चांगली कामगिरी करु शकला असता.

follow us