27 वर्षांचा दुष्काळ संपला… ऑस्ट्रेलियाला धूळ चारत दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन

27 वर्षांचा दुष्काळ संपला… ऑस्ट्रेलियाला धूळ चारत दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन

WTC Final : दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (ICC World Test Championship) विजेतेपद पटकावले. या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर (AUSVsSA) विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य दिले होते. आफ्रिकेने हा सामना पाच विकेट्सने जिंकला आहे. याचबरोबर आफ्रिकेने तब्बल 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी आफ्रिकेने 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी हा सामना जिंकण्यासाठी फक्त 69 धावांची गरज होती मात्र चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कर्णधार टेम्बा बावुमाच्या रूपात आफ्रिकेला पहिला धक्का बसला. बावुमाने 134 चेंडूत 66 धावा काढून बाद झाला. त्यानंतर 43 चेंडूत आठ धावा करून ट्रिस्टन स्टब्स पॅव्हेलियनमध्ये परतला.

तर स्टार फलंदाज एडेन मार्कराम 207 चेंडूत 136 धावा करून बाद झाला मात्र त्यानंतर आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामध्ये महत्वाची भूमिका वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडेन मार्करामने बजावली. रबाडाने या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आणि चौथ्या डावात मार्करामने शानदार 136 धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमानेही शानदार 66 धावांची खेळी केली. शेवटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, विजयी धाव काइल व्हेरेनच्या बॅटवरून आला.

बॉन्ड्रीवरील कॅच घेण्याच्या नियमात मोठा बदल; आता एकदाच हवेत फेकता येणार बॉल

282 धावांचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी 2 विकेट्सवर 213 धावा केल्या, ज्यामध्ये टेम्बा बावुमा आणि एडेन मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube