बॉन्ड्रीवरील कॅच घेण्याच्या नियमात मोठा बदल; आता एकदाच हवेत फेकता येणार बॉल

बॉन्ड्रीवरील कॅच घेण्याच्या नियमात मोठा बदल; आता एकदाच हवेत फेकता येणार बॉल

Cricket New Rule : क्रिकेटमध्ये आता नवीन बदल करण्यात येणार आहे. या बदलाचा फायदा फलंदाजांना (Cricket New Rule) होणार आहे. मेलबर्न क्रिकेट म्हणजेच एमसीसीने (MCC) दिलेल्या माहितीनुसार बॉन्ड्रीवरील कॅच घेण्याच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहे. नवीन नियमानुसार आता, बॉन्ड्रीवर  खेळाडूंना  ‘बनी हॉप’ (Bunny Hop) करता येणार नाही. बनी हॉप म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू बॉन्ड्रीबाहेर जाऊन हवेत उडी मारुन बॉल आत फेकतो मात्र या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार आता बॉन्ड्रीच्या आत राहून बॉलला स्पर्श करणे आवश्यक आहे नाहीतर फलंदाजाला आऊट देता येणार नाही. हा बदल या महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. तर ऑक्टोबर 2026 पासून हा बदल एमसीसीमध्ये लागू करण्यात येणार आहे.

नवीन नियमानुसार, क्षेत्ररक्षक खेळाडू बॉन्ड्रीबाहेर असलेल्या बॉलला फक्त एकदाच स्पर्श करु शकतो आणि कॅचपूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा बॉन्ड्रीच्या आत यावे लागणार आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, खेळाडू बॉन्ड्रीबाहेर जाऊन अनेक वेळा उडी मारुन बॉलला स्पर्श करु शकत होता. 2023 मध्ये  बीबीएलमध्ये मायकेल नेसरने असाच झेल घेतल्याने हा नियम चर्चेचा विषय बनला होता.

त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला, एमसीसीने आयसीसीला एक नोट पाठवली होती, ज्यामध्ये त्यांनी नेसरचा झेल ‘बनी हॉप’ असे वर्णन केले होते आणि बॉन्ड्रीबाहेर जाऊन कॅचसाठी अनेक प्रयत्न करणे योग्य नसल्याने या नियमात बदल करण्यात यावे अशी मागणी केली होती.

संजय शिरसाट नोटीस पाठवा, वकिलांना पेमेंट मी करतो; माजी खासदार इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप

तर दुसरीकडे खेळाडू कॅचसाठी बॉलला बॉन्ड्रीमध्ये असताना ढकलतो आणि स्वतः बाहेर पडतो आणि नंतर बॉल पकडण्यासाठी परत डायव्ह करतो अशी कॅच आता देखील मान्य असेल अशी देखील माहिती एमसीसीने दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube