गोलंदाजाला 5 ओव्हर अन् Impact Player रद्द करण्याची मागणी; सचिन तेंडुलकरने सुचवले IPL साठी 3 नवीन नियम

Sachin Tendulkar On Impact Player : आज आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि जीटी एकमेकांशी भिडणार आहे. या हाय

Sachin Tendulkar On Impact Player

Sachin Tendulkar On Impact Player

Sachin Tendulkar On Impact Player : आज आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि जीटी एकमेकांशी भिडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार आणि खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी आयपीएलचे काही नियम बदलण्याची मागणी केली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना सचिनने आयपीएलमध्ये (IPL) सध्या लागू असलेला इम्पॅक्ट प्लेअरचा नियम रद्द करण्याची तसेच काही नवीन नियम आयपीएलमध्ये लागू करण्याची मागणी बीसीसीआयकडे (BCCI) केली आहे.

मुंबईत आयोजित ‘क्रिकइन्फो पुरस्कार’ कार्यक्रमात बोलताना सचिन (Sachin Tendulkar) म्हणाला की, टी20 क्रिकेटमध्ये फक्त 20 ओव्हर खेळायची असतात. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक फलंदाज संघात जोडण्याची संधी दिली जाते. सामन्यात आधीच गोलंदाजांसमोर अनेक आव्हाने असतात. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरमुळे खेळाचा समतोल बिघडल्याचे मला वाटते असं या कार्यक्रमात बोलताना सचिन म्हणाला.

तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना सचिनने बीसीसीआयकडे आयपीएल नियामांबाबत काही काही प्रस्ताव देखील मांडले. सध्याच्या नियमांनुसार, आयपीएलमध्ये पहिल्या सहा ओव्हरचा पॉवरप्ले असतो मात्र सचिनने दिलेल्या प्रस्तावानुसार, सहा ओव्हरमधील पहिले चार ओव्हर फलंदाजांसाठी राखून ठेवावीत आणि उर्वरित दोन पॉवरप्ले ओव्हर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्याच्या सोयीनुसार वापरण्याची परवानगी द्यावी त्यामुळे सामन्यात गोलंदाजांना देखील काही प्रमाणात फायदा मिळू शकतो असं सचिन या कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

तर प्रत्येक गोलंदाजाच्या चार ओव्हरच्या मर्यादेत वाढ करुन पाच ओव्हर करण्यात यावी असा प्रस्ताव देखील सचिनने मांडला. या वेळी सचिन म्हणाला की, संघातील सर्वोत्तम फलंदाज अनेकदा संपूर्ण 20 ओव्हर खेळतो मग सर्वोत्तम गोलंदाजाला पाच ओव्हर टाकण्याची संधी का मिळू नये?

मोठ्या पडद्यावर येणाऱ्या ‘मिर्झापूर: द मूव्ही’बाबत अली फजलने सांगितली खास गोष्ट

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वादात सापडला आहे. या नियमाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यासह अनेक दिग्गजांनीही टीका करत नियम रद्द करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version